ख्रिसमस निमित्त अनाथ मुलांना स्नेह भोजन तसेच शालेय साहित्याचे वाटप
बारामती ( वार्ताहर ) येथील ख्रिस्त सेवा संघ बारामती यांच्यावतीने ख्रिसमस निमित्त अनाथ मुलांसाठी स्नेह बोजन तसेच शालेय उपयोगी वस्तू व खेळनी वाटप करून ख्रिसमसचा आनंद साजरी करण्यात आला.
येथील सावली अनाथ आश्रम बारामती येथील अनाथ मुलांसाठी सावली अनाथ आश्रम येथे ख्रिसमस निमित्त दैनंदिन गरजेची शालेय साहित्य आणि खेळणी वाटपाचा तसेच उपस्थित मुलांच्या सोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम ख्रिस्त सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी पास्टर किशोर राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला तर सेवा संघाचे अध्यक्ष सुशील राठोड, उपाध्यक्षा सुरेखा जाधव, पास्टर अॅलिव्हर कुमार, पास्टर जेम्स कांबळे, अशोक जाधव, रॉबिन कांबळे, अजिता राठोड, चैतन्य मेश्राम्कार, सुझेन मेश्राम्कार, विभा जाधव, अनुराधा राठोड आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले तर यावेळी सावली अनाथ आश्रमाचे प्रमुख महेश अहिवळे, यांनी आभार मानले. तसेच समाजातील इतर घटकांनी देखील आश्रमात असे कार्यक्रम राबवावेत असे यावेळी आवाहन केले.