आज दि.२८/०४/२०२० रोजी...
*राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती येथे बारामती वेल्फेअर ट्रस्ट,मुंबई व बारामती तालुका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल यांचे संयुक्त विद्यमाने बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रधान करण्यात आले.*
सरकारी डॉक्टरांबरोबर खाजगी वैधकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी लोकांना चांगली तत्पर व दररोज सेवा द्यावी व त्यांनाही संरक्षण मिळावे याच हेतूने *आदरणीय पवार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार सो। व खासदार सौ.सुप्रियाताई सुळे सो।* यांचे सूचनेनुसार राज्यामध्ये "दीड लाखापेक्षा" जास्त डॉक्टरांना फेसशिल्ड मास्क चे वाटप केले असल्याचे तालुकाध्यक्ष श्री.संभाजी होळकर यांनी सांगितले आहे.
*याप्रसंगी आय.एम.ए.महाराष्ट्र राज्य,अध्यक्ष डॉ.अशोक तांबे, नगराध्यक्ष सौ.पौर्णिमाताई तावरे,तालुकाध्यक्ष श्री.संभाजी होळकर,शहराध्यक्ष श्री.इम्तियाज शिकीलकर, गटनेते श्री.सचिन सातव, मेडिकल गिल्ड अध्यक्ष डॉ.संजय पुरंदरे, आय.एम.ए.अध्यक्ष डॉ.सौ.विभावरी सोळुंके,डिसॅस्टर मॅनेजमेंट कमिटी डॉ. सुजित अडसूळ,राष्ट्रवादी डॉक्टर सेल शहराध्यक्ष श्री.डॉ.राजेंद्र चोपडे,राष्ट्रवादी डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष श्री.डॉ.सचिन बालगुडे, डॉ.अमरसिंह पवार आदी उपस्थित होते.*
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
• dr. vijaykumar bhise