बारामती :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार ,खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने बारामतीत 7000 कुटूंबाना एक हात मदतीचा. बारामती शहर व वाढीव हद्दीतील मोलमजुरी, घरकाम, करणाऱ्या 7000 हुन अधिक गरजु कुटूंबांना जिवनावश्यक वस्तूंचे किट घरपोच देण्यात आले. या कामामध्ये बारामती शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेंस पार्टीचे सर्व आजीमाजी नगरसेवक,बुथ कमिटी सदस्य व शहरातील विविध मृंडळांचे सहकार्य लाभले. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेंस पार्टीचे गटनेते श्री. सचिन सातव यांनी दिली.
संपुर्ण भारत देशामध्ये लॉकडाऊन लागु झाल्यानंतर बारामती शहरामध्येसुध्दा लॉकडाऊनचे परिणाम दिसु लागले व रोजच्या रोज मोलमजुरी, घरकाम, दैनंदिन काम करणा-यांचर प्रचंड आर्थिक संकट ओढु लागले, ही बाब श्री. शरदचंद्र पवार , उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ राष्ट्रवादी कॉंग्रेंस पार्टी, बारामती शहर यांच्यामार्फत अशा कुटुंबांचा सव्हेर् करुन यादी करण्याच्या सुचना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्ष श्री. इम्तियाज शिकिलकर, नगराध्यक्ष सौ. पौर्णिमा तावरे, उपाध्यक्ष सौ. तरन्नुम सय्यद, माजी नगराध्यक्ष श्री. सदाशिव सातव, गटनेते श्री. सचिन सातव व सर्व नगरसेवक,नगरसेविका यांना केली. सदर सर्वेमध्ये वारामती शहरातील व वाढीव हद्दीतील सर्व प्रभाग मिळुन जवळपास 7000 हुन अधिक अशी कुटूंबांची यादी तयार करण्यात आली ज्यांचे प्रपंच रोजच्या रोज मोलमजुरी, घरकाम, दैनंदिन कामावर अवलंबुन आहे अशा नागरिकांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे खासदार श्री. शरदचंद्र पवार ,उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार ,सौ.सुप्रिया सुळे यांचे सुचनेनुसार सदर 7000 हुन अधिक कुटूंबांना प्रत्येकी जिवनावश्यक वस्तुंचे 1 किट ( एका किटमध्ये प्रत्येकी 2.5 किलो गहु 2.5 किलो तांदुळ , 1 किलो डाळ ,1 किलो तेल ) द्यावयाचे ठरले, सदर अन्न धान्य व तेल व जिवनावश्यक वस्तू गोळा करण्याची जबाबदारी बारामती मर्चट असोसिएशन व बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांनी उचलली, त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. प्रताप सातव व बारामती मर्चंट असोसिएशनचे श्री. बाळासाहेब फराटे यांचे विशेष सूहकार्य लाभले आहे. सदर मालाचे पॅकींग राष्ट्रवादी कॉंग्रेंस भवन कसबा येथे श्री. संभाजी होळकैर, नगरसेवक सातव व काशिविश्वेश्वर तरुण मंडळाचे सदस्य यांनी सोशल डिस्टन्न्सींग, सॅनेटायझेशन,ग्लोज व मास्क वापरुन अत्यंत तांत्रिक पध्दतीने 7000 हुन अधिक किट तयार करण्यात आले होते.
धान्य वितरणावर
राष्ट्रवादी काँग्रेसचा वॉच
1 एप्रिलपासून बारामती शहरात शासनामार्फत रेशनिंग दुकानावर विविध योजनेअंतर्गत धान्य उपलबध आहे.यामध्ये अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत माणसी 2 रुपये किलो प्रमाणे 3 किलो गहु व 3 रुपये किलो प्रमाणे 2 किलो तांदूळ मिळणार आहे.तसेच अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 35 किलो धान्य मिळणार असुन एप्रिल,मे ,जून हे तीन महिने शासनाकडून प्रत्येकी माणसी 5 किलो तांदूळ मोफत मिळणार आहे.तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. कोरोनाचे संकट असताना अडचणीच्या काळात प्रत्येक लाभार्थींना रेशन दुकानदारांकडून धान्य सरकारच्या सुचनेप्रमाणे वितरीत केले जाते कि नाही यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लक्ष ठेवले जाणार आहे . शिक्षापत्रिकाधारकांनी रेशनधान्य दुकानदारांकडून सरकारच्या सुचनेप्रमाणे धान्य मिळत नसल्यास तहसिलदार,पुरवठा अधिकारी किंवा राष्ट्रवादी काँग्रेेसचे पदाधिकारी यांचेकडे रितसर तक्रार करावी असेही सचिन सातव गटनेते बारामती नगर परिषद यांनी सांगितले.