(हिंसक कृत्ये,गालगत्तेचे नुकसान किंवा हानी प्रतिबंध)अधिनियम राज्यात लागू तीन वर्षांपर्यंत कारावास, ५० हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद मुंबई दि. २५ : राष्ट्रपती यांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती, प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) करणारा अधिनियम २०१७ संपूर्ण राज्यात ८ नोव्हेंबर २०१९ पासून लागू करण्यात आला आहे. तो महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात त्याच तारखेला प्रसिद्ध करण्यात आला आहे. जो कोणी या अधिनियमातील तरतूदींचे उल्लंघन करून हिंसाचाराचे कोणतेही कृत्य करील किंवा करण्याचा प्रयत्न करील किंवा करण्यास अपप्रेरणा किंवा चिथावणी देईल किंवा त्यास प्रक्षोभित करील अपशा कोणत्याही अपराध्यास तीन वर्षापर्यंत कारावासाची किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद या महाविकास अधिनियमात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था