रायगड संवर्धनासाठी २० कोटी रुपये मुबइ, मुंबई, दि. २४ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर निर्णय दिला तो रायगड संवर्धन आणि परिसर विकासासाठी २० कोटी रुपये निधी वितरणाचारायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. या आराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय प्राबित होता. मी. ठाकरे यांनी रायगड किल्ल्याच्या विकासकामांची नस्ती मागवाली. त्यांनी विशेष बाब म्हणून निधी वितरणाच्या प्रस्तावास मान्यता देवून त्यासंदर्भातील नस्तीवर पहिली स्वाक्षरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हा राज्याचा समृद्ध वारसा असून त्याचे जतन करणे व पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी संवर्धन करणे आवश्यक असून राज्यशासन त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करील, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पहिला निर्णय रायगड संवर्धनासाठी २० कोटी रुपये