लहुजी शक्ती सेना, बारामती शहर व तालुक्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन

बारामती शहरात प्रशासकीय भवन येथे लहुजी शक्ती सेना, बारामती शहर व तालुक्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनाचे / मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार धनंजय जाधव यांनी स्विकारले.
यावेळी लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पप्पू भिसे, बारामती तालुका अध्यक्ष राजेंद्र भिसे, बारामती शहर अध्यक्ष अतुल गायकवाड, बारामती तालुका युवक कार्याध्यक्ष सचिन जाधव, बारामती तालुका उपाध्यक्ष संजय नेटके, जिल्हा संघटक बाळासो चांदणे, अमोल भिसे, अमोल इंगळे, पप्पू खरात, संदीप भिसे, सुरेश भिसे, विकास खंडाळे, रवि खंडाळे, प्रसिद्धी प्रमुख सचिन माने, पिंकी मोरे, सारिका लोंढे, राहुल खरात, विजय खरात, संजय रणदिवे, सोमनाथ पाटोळे, गुलाब माने, रामभाऊ भिसे, निलेश जाधव, विशाल भिसे, संजय वाघमारे, महेश नेटके यांसह मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने प्रशासनाकडे केलेल्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
अनुसुचित जातीमध्ये आरक्षणाची लोकसंख्येच्या प्रमाणात अ.ब.क.ड. प्रमाणे वर्गवारी करून मातंग
समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित असून या मागणी सह संसद
भवन व विधानभवन या 'ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे व आण्णा भाऊ साठे यांचे पुतळे बसवण्यात
यावेत. तसेच खालीलप्रमाणे अन्य मागण्या आहेत.
१) संगमवाडी पूणे या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाचे काम तत्काळ सूरु करण्यात यावे
२) साहित्यरत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.
3) लहजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी तत्काळ लागु करण्यात याव्यात.
४) मातंग समाजाला सातत्याने होणा-या अन्याय व अत्याचाराचे निर्मूलन करण्यासाठी स्वतंत्र आयाग
नेमण्यात यावा.
७) साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे विकास महामंडळ सर्व कर्ज माफ करून नव्याने त्वरीत कर्ज
उपलब्ध करून द्यावे.
६) मुंबई विद्यापिठाला साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे.
७) बारामतीत साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा.
वरील प्रमाणे आम्ही आपणांकडे लहुजी शक्ती सेनेच्या माध्यामातून अनेक वर्षापासून प्रलंबित
मागण्या सादर करित आहोत. तरी आपण समाजाच्या या मागण्यांचा लवकरात लवकर विचार करून
त्या मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातुन तीव आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने प्रशासनास देण्यात आला.


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image