बारामती परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद बारामती :- बारामतीमधील औद्योगिक वसाहतीमधील एका कपनीमध्ये 9 डिसेंबर रोजी बिबट्या घुसला होता. यानंतर बारामती व इंदापूर तालुक्याच्या परीसरामध्ये बिबट्या वावर होता त्यामुळे परिसरात या बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली होती गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याने काटेवाडी व कन्हेरी परीसरामध्ये धुमाकूळ घालून पाळीव प्राण्यांच्या कळपावर हल्ला करुन शेळ्यां मेढ्यांना पळवून नेले होते. तसेच दिवसा लोकवस्तीमध्ये देखील वावर सुरु होता त्याने नागरिक चांगलेच धास्तावले होते. बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील एका शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अचानक जेरबंद झाला. या बिबट्याला सुरुवातीला बारामती येथे हलविण्यात आले तद्नंतर वन विभागाच्या वरिष्ठ आधकाऱ्याच्या निदेशानुसार पुण्याला झालाविण्यात आल्याची माहिती वनसंरक्षक जराइ यांनी दिली. वनविभाग व रेस्क्यू पथक गेल्या अनेक दिवसापासून काटेवाडी व कन्हेरी परीसरामध्ये ठाण मांडून बसले होते. बिबट्याला पकडण्यासाठी सहा ट्रॅप तसेच अनेक कॅमेरे व तीन पिंजरे लावण्यात आले होते. गुरुवारी ( दि. ३०) रोजी पहाटेच्या वेळी कन्हेरी गावातील संतोष जाधव यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अचानक जेरबंद झाला.
बारामती परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद