सौ.सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती नगरपरिषदेत दिव्यांगांना निधी वाटप
• dr. vijaykumar bhise
बारामती नगरपालिकेमार्फत दरवर्षी दिव्यांगांसाठी विविध योजना व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.याच अनुषंगाने शनिवार दि.१५ फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी ठीक चार वाजता बारामती नगर परिषद समोरील प्रांगणात सौ.सुनेञा पवार यांच्या हस्ते दिव्यांगांना विविध योजना अंतर्गत निधी वाटप करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा वैभव तावरे,सौ.निता बारवकर ,सभापती पंचायत समिती बारामती,प्रांत अधिकारी श्री दादासाहेब कांबळे व तहसीलदार श्री विजय पाटील उपस्थित राहणार आहेत तरी बारामतीकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक- सौ.शारदा मोकाशी सभापती महिला व बालकल्याण समिती