शालेय शिक्षक व विद्यार्थी वाहतुकीच्या नियमांबाबत
दि.29 फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन बारामती दि.27 : - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,बारामती यांचे अधिनस्त शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षक व विद्यार्थी वाहतुक करणारे संघटना व त्यांचे चालक व मालक यांना वाहतुकीचे नियम व नियमांचे पालन तसेच स्कूल वाहनचालक व मालक यांच्या समस्या या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळा दि.२९ फेब्रुवारी २०२० रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे न्यू इंग्लीश स्कूलच्या सभागृहामध्ये दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेत होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास सर्व संबंधितांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे