बारामती शहर व तालुक्यात आयएमएच्या वतीने आरोग्यविषक उपक्रम राबविणे,पौंगडावस्थेतील महाविद्यालयीन मुलामुलींसाठी आरोग्यविषयक चर्चासत्र,नागरिकांना अवयवदानाची प्रक्रिया समजण्यासाठी अवयवदानाचे प्रबोधन,प्रचार आणि प्रसार ,प्लॅस्टीक निर्मुलनाच्या शासकिय चळवळीत सहभाग,महिलांमधील ऍ़निमीया दूर करण्यासाठी प्रबोधन व शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असून बारामती शहरातील पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी वृक्षारोपन करण्यात येणार असल्याचे मत नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ.विभावरी सोळुंके यांनी साप्ताहिक प्रविण चे संपादक डॉ.विजय भिसे यांचेशी बोलताना सांगितले.
आयएमए ची निवड करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्षपदी : डॉ.सौ.विभावरी श्रीरंग सोळूंके
उपाध्यक्षपदी डॉ.बापू भोई व डॉ.स्नेहलता पवार
सचिवपदी :- डॉ.संतोष घालमे,
सहसचिवपदी डॉ.दिपीका कोकणे,
खजिनदारपदी डॉ.सौरभ मुथा,
अभ्यासवर्गप्रतिनिधी :- डॉ.शशांक जळक,डॉ.अंजली खाडे,डॉ.अजित देशमुख,डॉ.सुरज भगत,
क्रिडा सचिव :- डॉ.माधुरी राऊत,डॉ.तुषार गदादे,डॉ.प्रशांत माने,डॉ.वरद देवकाते,
सहल सचिव :- डॉ.चंद्रशेखर धुमाळ,डॉ.किशोर रुपनवर,डॉ.निती महाडीक
सांस्कृतिक सचिव :- डॉ.दर्शना जेधे,डॉ.शुभांगी शहा डॉ.रेवती संत
वृत्तमाध्यम प्रतिनिधी :- डॉ.संताजी शेळके,डॉ.आशिष जळक,
न्यायवैद्यक सचिव :- डॉ.हर्षवर्धन व्होरा,डॉ.दिनेश ओसवाल,
महिला प्रतिनिधी :- डॉ.अपर्णा काटे,डॉ.शुभांगी महाडीक,डॉ.किर्ती पवार,डॉ.निकीता मेहता डॉ.मोनाली जाधव
राज्यस्तरीय कार्यकारिणी प्रतिनिधी :- डॉ.सचिन घोळवे,डॉ.दादा वायसे
कार्यकारी समिती :- डॉराजेंद्र मुथा,डॉ.साधना कोल्हटकर,डॉ.राजेश कोकरे,डॉ.डी.व्ही.जळक,डॉ.वैभव मदने,डॉ.पी.एन.देवकाते,डॉ.जितेंद्र आटोळे,डॉ.सुजित अडसुळ,डॉ.सुरज दुर्गुडे,डॉ.अमोल भंडारे
विश्वस्तपदी डॉ.एम.आर दोशी,डॉ.जे.जे.शहाडॉ.संजय पुरंदरे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी पुढील वर्षीच्या अध्यक्षापदी डॉ.अविनाश आटोळे यांची निवड होणार असल्याची घोषणाही करण्यात आली.
आयएमए चा पदग्रहन समारंभ बारामती क्लब येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिला पवार ,डॉ.पंकज बंदरकर व आयएमएचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ.अशोक तांबे,माजी अध्यक्ष डॉ.अमर पवार,माजी सचिव डॉ.सोमनाथ राऊत उपस्थित होते.