भारत स्टेज -4 मानकाच्या वाहनांची विक्री व नोंदणीदेखील केवळ दिनांक 31 मार्च 2020 पूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे.-परिवहन अधिकारी

बारामती दि.26 :- मा.सर्वोच्च्‍ न्यायालयाचे निर्देशानुसार दिनांक 1 एप्रिल 2020 पासून केवळ भारत स्टेज – 6 प्रदूषण मानकांचीच वाहने विक्री करता येतील व नोंदणी करता येतील. त्यामुळे भारत स्टेज -4 मानकाच्या वाहनांची विक्री व नोंदणीदेखील केवळ दिनांक 31 मार्च 2020 पूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे.


                     सर्व वाहनधारक व वाहनवितरकांना कळविण्यात येते की, त्यांच्याकडील बी.एस.- चार मानकांची नोंदणी काही कारणाने प्रलंबित असल्यास ती दि. 31 मार्च  2020 पूर्वी वाहनाची तपासणी, शुल्क व कर भरणा व नोंदणी क्रमांक पडणे या सर्व प्रक्रीया पूर्ण होणे आवश्यक आहे.


                   दिनांक 25 मार्च 2020 रोजी गुढीपाडवा असल्यामुळे या मुहूर्तावर जास्तीत-जास्त वाहने विक्री होण्याची शक्यता आहे. परिवहन आयुक्त , यांचे निर्देशानुसार वाहन नोंदणी पूर्ण होवून वाहनांस हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविल्यानंतरच वाहन वितरकांना वाहनाची डिलीव्हरी वाहन मालकास देणे बंधनकारक आहे. त्यामुळे नोंदणीसाठीची प्रक्रीया 4/5 दिवसांपूर्वीच सुरु करावी, असे सुचित करण्यात येत आहे.


                     दिनांक 1 एप्रिल 2020 पासून बी.एस-चार मानकांच्या वाहनांची विक्री / नोंदणी होणार नसल्यामुळे अशी वाहने स्क्रॅप करावी लागतील याची नोंद घेऊन सर्व संबंधितांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता  नोंदणी प्रक्रीया शक्यतो दिनांक 25 मार्च 2020 पर्यंतच पूर्ण करावी असे संजय धायगुडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांनी कळविले आहे.


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image