49 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना व आरक्षणाच्या हरकती 7 ते 14 फेबुवारी पर्यंत सादर कराव्यात
बारामती :- राज्य निवडणूक आयोगाने बारामती तालुक्यातील माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपणा-या एकूण 49 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षण चा कार्यक्रम क्र. रानिआ/ग्रापनि/प्र.क्र.13/का-08 दिनां 29.11.2019 अन्वये जाहिर केलेला आहे.
यानुसार बारामती तालुक्यातील सदर 49 सदर ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.सदर सोडतीच्या अनुषंगाने प्रभागरचना व आरक्षण यावर काही आक्षेप वा हरकत असल्यास हरकत घेणेचा कालावधी हा दिनांक 7 फेब्रुवारी 2020 ते 14 फेब्रुवारी 2020 असा आहे.
तरी सदरच्या हरकती दिनांक 7 फेब्रुवारी 2020 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत तहसिल कार्यालय, बारामती येथे कार्यालयीन वेळेत सादर करण्यात याव्यात, असे आवाहन तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.