बारामती:-खासदार श्री शरदचंद्र पवार साहेब व सौ प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त,गिरीराज हॉस्पिटल,बारामती तर्फे मोफत कॅन्सर निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.हे शिबीर रविवार दिनाक ८ मार्च २०२० रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत असणार आहे.तरी या शिबिराचा गरजूंंनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. रमेश भोईटे यांनी केले
काही दिवसांपूर्वीच खासदार श्री शरदचंद्र पवार साहेब व मा सौ प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हृदयरोगाने ग्रस्त असनाऱ्या रुग्णांसाठी १२ डिसेंबर २०१९ ते १२ फेब्रुवारी २०२० या कालावधीत सवलतीच्या दरामध्ये अन्जिओग्रफि आणि मोफत अन्जिओप्लासटी शिबीर घेण्यात आले ,या
शिबिरामध्ये ४२२ रुग्णांची सवलतीच्या दरामध्ये अन्जिओग्रफि व १५१ रुग्णांची मोफत अन्जिओप्लासटी करण्यात आली असून ३९ रुग्णांची बायपास सर्जरी देखील झाली.हीच सामाजिक बांधिलकी जपून आणि दिवसेंदिवस वाढत असणारे कॅन्सर या आजाराची चिंता लक्षात घेऊन त्यावर योग्य निदान व तत्पर उपचार गरजू रुग्णांना मिळवून देण्यासाठी हे मोफत कॅन्सर निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिराचे उद्घाटक ना.अजित पवार ,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,अध्यक्षा मा सौ पौर्णिमा तावरे (नगराध्यक्षा बारामती नगरपरिषद) विशेष अतिथी खा.सौ सुप्रिया सुळे (बारामती लोकसभा),आ.रोहीत पवार (कर्जत,जामखेड
विधानसभा) शिबिरामध्ये महिलांसाठी मोफत मॅमोग्राफी, पॅप स्मिअर करण्यात येणार आहे व इतर कॅन्सर ग्रस्त किंवा
तत्सम लक्षणे असणर्या रुग्णांसाठी कॅन्सर वरील मोफत शस्त्रक्रिया व केमोथेरपी उपचार करण्यात येणार
आहेत.
शिबिरासाठी उपलब्ध असणारे कॅन्सर तज्ञ डॉक्टर टीम
डॉ.मनोज लोखंडे (कॅन्सर सर्जन),डॉ.महेश संभूस (कॅन्सर सर्जन) डॉ. अश्विन राजभोज (मेदिकॅल ओंकॉलोजिस),डॉ. सुमित शहा (कॅन्सर सर्जन),डॉक्टर तुषार पाटील (कॅन्सर तज्ञ),डॉ. प्रवीण गायकवाड (रेडीओलोजीस्त),मंगेश मेखा (केमोथेरपिस्त)
खालील लक्षणे असणा-या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा
१-कोणत्याही व्याधीसाठी २ ते ३ महिने उपचारानंतर आजार बरा न होणे
२-अकारण वजनात घट होऊन भूक मंदावणे
३-आवजात बदल होणे -तीन आठवड्यापेक्षा अधिक दिवस खोकला राहणे
४- शरीरावर कोठेही वाढत जाणारी गाठ
५-पाणी अन्न गिळताना त्रास होणे
६- जन्मखून, तीळ,मस यांच्या रंगत / आकारात वाढ होणे७-महिलांच्या मासिक पाळीत व इतर वेळी जास्त रक्तस्त्राव होणे
८-महिलांच्या स्तनामधील गाठ
९-संडास होताना रक्तस्त्राव होणे
१०-पूर्वी कॅन्सर ची शस्त्रक्रिया झालेले किंवा कॅन्सर वर उपचार घेत असणारे रुग्ण रुग्णांनी शिबिरासाठी येताना रेशन कार्ड/आधार कार्ड /मतदार ओळखपत्र घेऊन येणे तसेच रुग्णाचे आधीचे रिपोर्ट व औषधे सोबत घेऊन येणे . सदर शिबिरासाठी कॅन्सर तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असणार आहे ,तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड असणार्यांना मोफत उपचारांची सोय उपलब्ध आहे.
या शिबिराचा लाभ गरजू ,संभाव्य लक्षणं असणाऱ्या आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्नानी जरूर घ्यावा असे
आवाहन गिरीराज हॉस्पिटल चे चेअरमन डॉ.रमेश भोईटे यांनी केले आहे
शिबिरासाठी संपर्क-गिरीराज हॉस्पिटल ०२११२-२२२७३९/२२१३३५ , ९२२५५८३३७१ इतर
माहितीसाठी रिसेप्शन डेस्क ला भेटावे हि नम्र विनंती
मोफत कॅन्सर निदान व उपचार शिबीर - डॉ. रमेश भोईटे
मोफत कॅन्सर निदान व उपचार शिबीर - डॉ. रमेश भोईटे