राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 7 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक

राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 7 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक


नवी दिल्ली, 25 : राज्यसभेत महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्वाच्या 7 जागांसाठी 26 मार्च 2020 ला निवडणूक होणार असून याच दिवशी  निकाल जाहीर होणार आहे.


            संसदेचे स्थायी सभागृह असणा-या राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 (2,9 आणि12 एप्रिल) मध्ये  संपत आहे. वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 55 जागांसाठी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.


असा असणार निवडणूक कार्यक्रम


             महाराष्ट्रासह 17 राज्यांच्या राज्यसभेतील 55 जागांसाठी 26  मार्च 2020 ला मतदान घेण्यात येणार आहे. 6 मार्चला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 मार्च असून 16 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल.  18 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर  26 मार्चला सकाळी 9 ते  दुपारी  4 वाजे दरम्यान मतदान घेण्यात येणार तर दुपारी 5 वाजता  मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image