महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांनी माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्याला बारामती नगरीच्या उपनगराध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल तसेच पत्नी सौ.ज्योती बल्लाळ हिस या नगरीच्या उपनगराध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो पुढील काळात अजित पवार यांना अभिप्रेत असलेल्या शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी अजित पवारच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे काम करणार आहे अजित पवारांच्या सूचनेप्रमाणे थोड्याच दिवसात बारामती शहर झोपडपट्टीमुक्त असेल, असा विश्वासही नवनाथ बल्लाळ यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यांनतर व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नवनाथ बल्लाळ यांनी आभार व्यक्त केले.