बारामती नगरपरिषदेत शासन निर्णयाद्वारे दि.२९ फेब्रुवारी २०२० पासुन शासकीय कार्यालयांसाठी ५ दिवसांचा आठवडा लागू करणेत आलेला असून त्यामुळे सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असतील. तथापि अत्यावश्यक सेवेतील शासकीय आरोग्य विभाग (स्वच्छता विभाग),अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा व विद्युत विभाग यांना ५ दिवसांचा आठवडा लागू असणार नाही असे आदेशात नमूद केले आहे
आदेशात नमूद केलेनुसार कार्यालयाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहील. तसेच
सर्व कार्यालयातील शिपाई कर्मचा-यांची कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी राहील.
तसेच कार्यालयीन वेळेमध्ये भोजनाची सुट्टी दुपारी १ ते २ या वेळे मधील जास्तीत जास्त अर्ध्या वेळ निश्चित करण्यात
आली आहे. तरी बारामती नगरपरिषद कार्यालयामध्ये अधिकारी / कर्मचारी वर्गाकरीता कार्यालयीन वेळेत भोजनासाठी दुपारी
१.३० ते २.०० या अर्ध्या तासाची वेळ घेणेत यावी.
सदर आदेशाची अंमलबजावणी दि.२९/०२/२०२० पासुन करणेत यावी.यात कसूर होणार नाही. याची दक्षता घेेणेत यावी
असे आदेश योगेश कडूसकर मुख्याधिकारी,गट- अ बारामती नगरपरिषद, बारामती यांनी दिले आहेत
बारामती नगरपरिषद वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहील.भोजन सुट्टी दुपारी१.३०.ते २