दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी गणेश मार्केट वाहनतळावर वाहने लावावीत- योगेश कडूसकर बारामती :- बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व व्यवसायिक हॉटेल मालक, कापड दुकानदार, किराणा दुकानदार,
उपहारगृहे, किरकोळ विक्रेते, पदपथावरील विक्रेते, भाजी विक्रेता, उद्योग व्यवसायिक व नागरिक यांना कळविणेत येते
की, बारामती नगरपरिषदेने गणेश मार्केट भाजी मंडई येथे नगरपालिके मार्फत चार चाकी व दोन चाकीची पार्किंग ची सुविधा तुर्त विनामुल्य उपलब्ध केलेली आहे. तरी सर्वांनी आपआपली वाहने पार्किंग मध्ये लावावी अन्यथा पुढील योग्य ती कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. अशी माहिती योगेश कडूसकर मुख्याधिकारी गट - अ बारामती नगरपरिषद,बारामती यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे
दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी गणेश मार्केट वाहनतळावर वाहने लावावीत- योगेश कडूसकर