शेतकऱ्यांची फसवणुक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाचे धरणे आंदोलन -सतीश फाळके


शेतकऱ्यांची फसवणुकआणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाचे धरणेआंदोलन -सतीश फाळके




बारामती :- जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचीफसवणुक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यातमहिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीयजनता पार्टीतर्फे सोमवार दिनांक 02 मार्च 2020 रोजी बारामती येथेतहसिल कार्यालयामोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहितीभारतीय जनता पाटी बारामती शहर अध्यक्ष  माजी नगरसेवक श्री.सतिश फाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.


यावेळी  जिल्हा सरचिटणीस श्री. अविनाश मोटे म्हणाले की, भाजपाचाविश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्याशिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करीतअसताना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेचकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनअवकाळीग्रस्तांना 25 हजार रूपये हेक्टरी आणि फळ बागांसाठी 50हजार रूपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकासआघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे.सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अश घोषणा करणाऱ्यामहाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही.महाआघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱ्यांची सरसकटफसवणुक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचीफक्त अल्प मुदतीची पिक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे.त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही.दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्याशेतकऱ्यांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाचउल्लेख नाही.


भा.ज.पा. सरकारच्या कर्जमाफीत पिक कर्ज तसेच मध्यम मदतीचे कर्जसाविष्ट केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट, शेती उपकरणं, पशुपालन,शेळीपालन मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्याना लाभमिळाला होता. भा.ज.पा. सरकारच्या व्यापाक कर्जमाफीमुळे 43 लाखखातेधारकाना 19 हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. तर खरेदीचेनिकष महाविकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शेतकऱ्यांकड़नहोणाऱ्या खरेदीचे प्रमाण खुप कमी झाले आहे. शेतकऱ्यांची घोरफसवणुक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनतापार्टी तीव्र निषेध करत आहे असे भारतीय जनता पार्टी बारामती शहरअध्यक्ष  माजी नगरसेवक श्री. सतिश फाळके म्हणाले. त्यांनी सांगितलेकी, गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्याघटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यागुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महा विकास आघाडी सरकारचे मंत्रीगावोगावी सत्कार घेण्यात मश्गूल आहेत हे सरकार सत्तेवर आल्यानंतरगुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथीलप्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपुर्ण देश हादरून गेला आहे.ऍ़सिड हल्ला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळूनटाकणे अशा घटना वाद लागल्यामुळे महिला  तरूणी मुलींमध्ये भितीचेवातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्याघटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीसरकारचा भा.ज.पा. तीव्र निषेध करीत आहे. त्यांनी सांगितले की,मंगळवारी होणाऱ्या आंदोलनात मा.श्री. बाळासाहेब  गावडे- प्रदेशउपाध्यक्ष , श्री. दिलीप  खैरे - मा.चेअरमन पुणे जिल्हा मार्केट कमिटी, श्री.रंजन तावरे ,श्री. चंद्रराव तावरे ज्येष्ठ संचालक श्री. प्रशांत सातव,श्री.यशपाल भोसले श्री. विजय गव्हाळे श्री. आसिफ खान ò यांच्यासहपक्षाचे पदाधिकारी  कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.



Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image