बारामती नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांची रचना, स्थायी समिती, सभापती निवडीची विशेष सभा नगरपरिषदेच्या, शरदचंद्र पवार सभागृहात पिठासीन अधिकारी श्री. विजय पाटील, तहसिलदार बारामती यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 17/02/2020 रोजी सकाळी 11.00 वाजता सभेस सुरुवात होऊन दु. 1.30 वाजता सभा संपन्न झाली. यामध्ये नियोजन व विकास समितीच्या सभापती वगळता सर्व समित्या गठीत होवून सभापती निवड करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे.
अ.क्र. समितीचे नाव सभापती
1 सार्वजनिक बांधकाम समिती मा. श्री. संतोष बाळकृष्ण जगताप
2 शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती मा. सौ. शितल गणेश गायकवाड
3 स्वच्छता, वैद्यक आणि सार्व. आरोग्य समिती मा. श्री. कुंदन किशोर लालबिगे
4 पाणीपुरवठा व जलनिस्स:रण समिती मा. सौ. सविता सुजित जाधव
5 महिला व बालकल्याण समिती मा. डॉ. सौ. सुहासिनी सचिन सातव
महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती मा. सौ. अनिता विनोद माने यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे सभापती आहेत. मा. स्थायी समिती सदस्य नामनिर्देशन करीता 1) मा. श्री. सचिन सदाशिव सातव 2) मा. श्री. किरण बबनराव गुजर 3) श्री. सुधीर मुरलीधर पानसरे यांची निवड करण्यात आली. याकामी सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी श्री. योगेश कडूसकर यांनी काम पाहिले.
बारामती नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री.नवनाथ बल्लाळ यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा वैभव तावरे यांच्याकडे दिल्याने लवकरच उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल अशी माहिती मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी दिली.