बारामती :- बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्री.अनिल पांडुरंग खलाटे तर उपसभापतीपदी बाळासाहेब बाबुराव पोमणे यांची निवड करण्यात आली.उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या सुचनेनुसार ही निवड करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष संभाजीराव होळकर यांनी सांगितले.यावेळी माजी सभापती शौकत कोतवाल,माजी उपसभापती सौ. शशिकला प्रताप वाबळे यासंह पंचायत समिती माजी सभापती संजय बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सहायक निबंधक एस.एस.कुंभार व सर्व संचालक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनिल खलाटे तर उपसभापतीपदी बाळासाहेब पोमणे यांची निवड