ससून सर्वोपचार रुग्णालयात लैंगिक अत्याचार पीडितांना साह्यासाठी एक खिडकी योजनेचे उदघाटन


पुणे- दिनांक 4 फेब्रुवारी 2020 रोजी ससून सर्वोपचार रुग्णालयात लैंगिक_अत्याचार पीडितांना साह्यासाठी एक_खिडकी_योजनेचे उदघाटन  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एन. पी. धोटे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते.
यावेळी बोलताना अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले की,एक खिडकी योजनेमध्ये (वन स्टॉप सेंटर ) बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचारअसिड_हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना वैद्यकीय_सल्ला, समुपदेशन, अर्थसाह्यकायदेशीर_सल्ला आणि पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य_योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. ससून तर्फे एका छत्राखाली स्त्रीरोगशास्त्र, बालरोगशास्त्र, बालरोगशल्य चिकित्साशास्त्र मनोविकारशास्त्र, प्लास्टिक सर्जरी व न्यायवैद्यकशास्त्र या विभागातील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला दिला जाईल. तसेच पुणे जिल्हा विधिसेवा प्राधिकरन यांचे तर्फे मोफत कायदेशीर सल्ला दिला जाणार आहे. यासाठी अड़वोकेट लक्ष्मी वाघमारे, अड़वोकेट उज्ज्वला थोरात आणि अड़वोकेट . श्रुती डुंबरे या विधिज्ञांची नेमणूक केलेली आहे. यामुळे लैंगिक अत्याचार पीडित व्यक्ती साहाय्य घेण्यासाठी पुढे येतील व त्यांना न्याय मिळणे सुलभ होईल . अत्याचार पीडित व्यक्तींचा वेळ वाचेल . वैद्यकीय उपचार , समुपदेशन व कायदेशीर सल्ला ससून सर्वोपचार रुग्णालयातच मिळाल्यामुळे पीडित व्यक्तीच्या पुनर्वसनात मोलाचा हातभार लागेल.
या कार्यक्रमाला उपाधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ.रमेश भोसले , डॉ.वंदना दुबे, डॉ. आरती किणीकर, डॉ. नितीन अभिवंत , डॉ. अजय तावरे, डॉ. विजय जाधव, डॉ,मीनाक्षी भोसले व डॉ.सोमनाथ सलगर उपस्थित होते .


 


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image