बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रातील आठवडा बाजार 31 मार्च 2020 पर्यंत बंद
बारामती दि.17 : - बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक, व्यावसायिक , हॉटेल मालक, कापड दुकानदार, किराणा दुकानदार, उपहारगृहे, किरकोळ विक्रेते, पदपथावरील विक्रेते, भाजी विक्रेता, उद्योग व्यावसायिक यांना कळविणेत येते की , गुरूवार दिनांक 19 मार्च 2020 पासून गणेश मार्केट भाजी मंडई व सुर्यनगरी जळोची येथील भाजी मंडई व सर्व आठवडे बाजार मंगळवार दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत कोरोना आजाराच्या प्रसारास प्रतिबंध करणेकामी बंद ठेवण्यात येणार असल्याचे नगरपरिषद उपमुख्याधिकारी , बारामती पद्मश्री दाईगडे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.