कु.चैत्राली अजय भिसे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड अनुसुचित जाती महिलांमध्ये राज्यात 6 वी 

कु.चैत्राली अजय भिसे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड
अनुसुचित जाती महिलांमध्ये राज्यात 6 वी 
बारामती :-कु.चैत्राली अजय भिसे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली असून चैत्राली भिसे यांनी अनुसुचित जाती महिलांमध्ये 6 वा क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या 2018 च्या पोलिस उपनिरीक्षकपदी पदासाठी निकाल 17 मार्च 2020 रोजी जाहीर करण्यात आला आहे.राज्यात  अनुसुचित जाती महिलांमध्ये पहिल्या आलेल्या निशीगंधा नानासाहेब म्हस्के यांना 217,श्रध्दा रमेश खरे 215,सुवर्ण मारुती पवार यांना 207,भावना विजय भिंगारदिवे यांना 203,प्रियांका खेमराज मेश्राम यांना 202, चैत्राली भिसे यांना 202 गुण मिळाले आहे.अनुसुचित जाती महिला मध्ये राज्यात 6 क्रमांक मिळाला आहे.
चैत्राली भिसे यांचे प्राथमिक शिक्षण पुणे विद्यार्थी गृह,माध्यमिक शिक्षण रेणुका स्वरुप हायस्कुल पुणे  तर 11 वी ते पदवीधर (बीकॉम) चे शिक्षण सर परशूराम महाविद्यालय पुणे येथे झाले आहे.
ध्येय निश्चीत करुन नियोजनबध्द अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेत यश 100 टक्के मिळते असे चैत्राली अजय भिसे यांनी सांगितले. आई सौ.केतकी भिसे , वडील श्री.अजय भिसे (वृक्ष निरीक्षक पुणे महानगरपालिका)व भाऊ पोलीस कॉन्स्टेबल मयूर भिसे यांचे खंबीर पाठबळ आणि शिक्षकांचे मार्गदर्शनामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळाले असल्याचे चैत्राली भिसे यांनी सांगितले.
बारामती येथील कै.रामचंद्र हरिभाऊ भिसे गुरुजी श्रीमती.सुमन रामचंद्र भिसे व पुणे येथील श्री.मोतीराम नामदेव शिंदे सौ.मंगल मोतीराम शिंदे माजी उपमहापौर हिरामण शिंदे माजी नगरसेविका सौ.रेखा हिरामण शिंदे यांची  चैत्राली भिसे नात असून ,माजी नौसैनिक संजय भिसे,साप्ताहिक प्रविण ,बारामती टूडे चे संपादक डॉ.विजय भिसे व बारामती नगरपरिषदेचे क्षेत्रीय अधिकारी मिलींद भिसे यांची पुतणी आहे.
चैत्राली भिसे यांची पोलिस उपनिरीक्षपदी निवड झाल्यामुळे सर्वत्र  अभिनंदन होत आहे.


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image