बारामतीत रक्ताचा तुटवडा- रक्तदान करा
बारामती ( वार्ताहर ) वाढता कोरोणाचा प्रादुर्भाव आणि जमावबंदी लागू झाल्याने रक्तदात्यांनी ब्लड बँकेकडे पाठ फिरवली असल्याने ब्लड बँकेतून रक्त पुरवठा करणे अशक्य झाले असल्याचे येथील लेट माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीचे सचिव डॉ. अशोक दोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून मत व्यक्त केले आहे.
रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँकेत रक्त संकलित केले जाते मात्र जमाव बंदी लागू झाल्याने आणि नागरिकांनी कोरोणाची भीती मनात बाळगल्याने रक्त संकलन करण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, रक्त संकलन होत नसल्या कारणाने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे.
रक्तदान केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा कोणताही धोका होणार नसून इच्छुक रक्तदात्यांनी आणि शिबीर आयोजकांनी येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीत जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे यांना 9096383959 यावर संपर्क करून पाच – पाच च्या गटाने रक्तदान करावे जेणे करून गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे सोपे होईल असेही आवाहन डॉ दोशी यांनी केले आहे.