बारामतीत भाजपा चे धरणे आंदोलन संपन्न

शेतकऱ्यांची फसवणुक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपा बारामती शहर व तालुकाच्या वतीने तहसिल कार्यालय बारामती येथे धरणे आंदोलन
सध्याचे महाविकास आघाडी सरकार यांचेकडून शेतकऱ्यांची फसवणुक आणि महिलांवरील वाढत्या आत्याचाराच्या निषेधार्थ भा.ज.पा. बारामती शहर व तालुकाच्या वतीने ता. २/३/२०२० रोजी बारामती तहसिल कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथील मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले सदर प्रसंगी तहसिलदार बारामती श्री. विजय पाटील यांनी श्री. सतिश फाळके, शहराध्यक्ष - भा.ज.पा. बारामती, श्री. अविनाश मोटे - सरचिटणीस भा.ज.पा. पुणे जिल्हा, श्री. विजय गव्हाळे - माजी नगरसेवक, बारामती नगरपरिषद, श्री. राजेश कांबळे - मा. तालुका अध्यक्ष, भा.ज.पा. तसेच श्री. अजित बापू साळुके, जहीर पठाण, जयवंत सातव यांचेकडून निषेध पत्र स्वीकारले. सदर पत्रामध्ये -
१) शेतकऱ्यांची फसवणुक करणारे महाविकास आघाडी सरकार - भाजपाचा विश्वाससघात करून काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेचे पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रूपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रूपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. श्री. देवेंद्र फडवणवीस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रूपये एवढी मदत जाहीर केली होती. पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही मदत आणखी वाढवू असेही आपल्या सरकारने जाहीर केले होते. या महाविकास आघाडी सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आठ हजार पेक्षा एक रुपयाचीही अधिक मदत दिलेली नाही. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. महाआघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱ्यांची सरसकट फसवणुक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ केली आहेत. केवळ पीक कर्जाचा या कर्जमाफीत समावेश केल्याने बहुसंख्य शेकतऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही. भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट, शेती उपकरणं, पशुपालन, शेळीपालन, मधमाशीपालन अशा  सर्व प्रकारच्या शेतकन्यांना लाभ मिळाला होता. भाजपा सरकारच्या व्यापक कर्जमाफीमुळे ४३ लाख खातेधारकांना १९ हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. तूर खरेदीची निकष जाणीवपूर्वक बदलण्यात आल्यामुळे जेथे २०१७-१८ मध्ये प्रति हेक्टरी १४.५ क्विंटल खरेदी होत होती, तेथे आता २०१९-२० मध्ये केवळ ८.४६ क्विंटल प्रति हेक्टरी इतकीच खरेदी होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर हे प्रमाण ३.६ क्विंटल इतके कमी करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची घोर फसवणुक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी निषेध करीत आहे.
२) महिलांवरील आत्याचारात मोठी वाढ -
तसेच गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाच्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अँसिडहल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार,महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला, तरूणी, मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अयशस्वी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी निषेध करीत आहे.
वरीलप्रमाणे सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केल्याचे व महिलांवरील आत्याचारात मोठी वाढ झाल्याचे प्रशासनास दाखवून दिले तसेच सध्याची महाविकास आघाडी सरकार ही सरकार चालविण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते. तसेच सदर प्रकरणांमध्ये सरकारने लक्ष न दिल्यास अशाच प्रकारची आंदोलने करून जनतेची होणारी नुकसानी थांबविण्यास कटीबध्द राहील असे कळविण्यात आले.
यावेळी रवी कोकरे, धैर्यशिल तावरे, मुकेश वाघेला, शिवाजी लोणकर, संदिप अभंग,सुनिता झेंडे, पिंकी मोरे, सारिका लोंढे, सुनिल माने, ओंकार भेलके, शाम खजिनदार, प्रमोद डिंबळे, दिपक वाघ, पप्पु शेळके व इतर भा.ज.पा. कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image