माळेगाव कारखाना चेअरमन निवड ८ मार्च रोजी
दि माळेगांव सह.सा.का.लि,संचालक मंडळाची सभा, रविवार दिनांक ८.३.२०२० रोजी सकाळी ११.३० वाजतां,
मा. निवडणूक निर्णय अधिकारी/अध्यासी अधिकारी, दि माळेगांव सहकारी साखर कारखाना लि., माळेगांव बु (शिवनगर) ता. बारामती जि पुणे तथा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर-३ यांचे अध्यक्षतेखाली कारखान्याचे कार्यस्थळावरील यशवंतराव चव्हाण सभागृहांत खालील विषयांचा विचार विनिमय करणेकरीतां बोलाविण्यांत येत आहे. तरी सदर सभेस आपण अवश्य उपस्थित रहावे अशीविनंती आहे.
: सभेपुढील विषय १.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क ब (१२) व महाराष्ट्र सहकारी संस्थां (समितीची निवडणूक) नियम २०१४ नियम ७७ मधील तरतुदीनुसार मा. चेअरमन यांची निवड करणे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क ब (१२) व महाराष्ट्र सहकारी संस्थां (समितीची निवडणूक) नियम २०१४ नियम ७७ मधील तरतुदीनुसार मा. व्हाईस चेअरमन यांची निवड करणे.