प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ११ वा गटविकास अधिकारीयांनी बैठक घेणे आवश्यक

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ११ वा गटविकास अधिकारी बैठक घेणे आवश्यक


मुंबई:- सर्वसामान्य लोकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हयातील सर्व तालुक्यात लोकांच्या तक्रारी/गाहाणी/अडचणी सोडवणूक करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही
करण्यात यावी.
१. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयात तालुक्यातील लोकांच्या तक्रारी/गाहाणी/अडचणींची सोडवणूक करण्याकरिता सभा आयोजित करावी.
२. सदर सभेबाबत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीतील सर्व तक्रारदाराना सभेपूर्वी ८ दिवस आधी अवगत करावे.
३. उपरोका सभेमध्ये प्राप्त तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करून, सदर दिवशी आलेल्या अर्जाची संख्या व त्यावर केलेली कार्यवाही याबाबतची लेखी स्वरूपात माहिती संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सादर करावी.
४. तद्नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हयातील सर्व गट विकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त माहिती संकलित करून संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करावी.
५. सर्व विभागीय आयुक्त यांनी विभागातील सर्व जिल्हयांकडून प्राप्त माहितीचे संकलन करूनशासन परिपत्रक क्रमांक: मविसे १०२०/प्र.क्र.४१/२०२०/आस्था-३ त्याचा गोषवारा महिन्याच्या शेवटच्या आठवडयात मा. मंत्री (ग्रामविकास) व अतिरिक्त मुख्य सचिव (ग्रामविकास व पंचायत राज) यांच्या कार्यालयास सादर करावा.
६. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२००३०२१७४२२७३९२० असा आहे. हा परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(पं. खं. जाधव)
उप सचिव, महाराष्ट्र शासन


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image