बारामती: तालुक्यातील सावळ येथे माजी सरपंच रमेश साबळे यांच्या वतीने गावातील गरजू १२५ कुटुंबाना मोफत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. यामध्ये एक किलो हरभरा डाळ, एक किलो खाद्यतेल, दोन किलो साखर, एक साबण व चहा पावडर या वस्तुंचा समावेश होता. आरोग्य सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून योग्य ते सामाजिक अंतर ठेवून वस्तुंचे वाटप करण्यात आले.
यावेळी बारामती खरेदी विक्री-संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय आवाळे, तलाठी श्री. चोरमले, सरपंच राजेंद्र आटोळे, ग्रामसेवक रावबा गौंड आदी उपस्थित होते.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे ग्रामीण भागात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना बाहेर फिरता येत, हाताला कामही मिळत नाही. अशा परिस्थितीत राज्यातील प्रत्येक गावातील किमान १० सधन व्यक्तींनी अशाप्रकारे रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबास मदत करण्याची गरज असल्याचे रमेश साबळे यांनी सांगितले.