राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बारामतींच्यावतीने 60 गरीब कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप

बारामती :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती बारामतींच्यावतीने 4 एप्रिल रोजी श्रमिक नगर, मलगुंडे वस्ती या ठिकाणी राहणाऱ्या 60 गरीब कुटुंबातील व्यक्तींना गहू, तांदूळ, तूरडाळ, तेल, मीठ, तिखट यांचे वाटप केले.


याच भागामध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडल्यामुळे या भागात कोणतीही मदत पोचवायला तसेच किराणा, भाजीपाला ,दूध ,इत्यादी वस्तू पोचवायला कोणीही जायला धजवत नव्हते त्या भागातील लोकांना या वस्तूंची अत्यंत गरज होती. या भागात बांधकाम मजूर तसेच रोजंदारीवर काम करणारे अनेक कुटुंबे राहत आहेत. मदत कार्यासाठी आलेल्या संघ स्वयंसेवकांनी या लोकांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे महत्व काय हे समजावून सांगितले.


याच भागातील उर्वरित 30 कुटुंबांना असाच शिधा पोहोच केला जाणार आहे.


हे साहित्य देण्यासाठी बारामतीतील अनेकांनी सहकार्य केले या सर्वांचे संघाच्यावतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


 


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image