अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू
अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू आहे.या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००८३३३३३३ तर व्हाट्सअँप क्रमांक ८४२२००११३३ आहे. या क्रंमाकावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येत असल्याने नमूद क्रमांकावर अवैध मद्य बाबतची तक्रार नोंदविण्यात यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्री कांतीलाल उमाप यांनी केले आहे.