अत्यावश्यक सेवा उद्योगासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती - जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे, दि.15 : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली आहे.


            पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. कंसात त्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. सहसंचालक (उद्योग)सदाशिव सुरवसे (9923911196) यांच्याकडे औद्योगिक क्षेत्रातील शासनाने दिलेले निर्देशक मार्गदर्शक सूचनाप्रमाणे अत्यावश्यक त्या सेवेचे उद्योग सुरु ठेवण्यासाठी समन्वयक म्हणून काम पहाणे व याकामाबाबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी माहिती सादर करणे.


 एमआयडीसीचे उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल (7028425256) यांच्याकडे महामंडळाच्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक सेवाकरीता संबंधित असणाऱ्या उद्योगांना परवानग्या देणे.


क्षेत्र व्यवस्थापक काळे (8975003969) यांच्याकडे पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि आकुर्डी,


क्षेत्र व्यवस्थापक भिडे यांच्याकडे (8275378459) बारामती व पणदरे,


क्षेत्र व्यवस्थापक हसरमनी (9822973006) यांच्याकडे चाकण-1,2,3 व 4, क्षेत्र व्यवस्थापक घाटे (9975148872) यांच्याकडे रांजनगाव व तळेगाव  या भागाची सोपविण्यात आली आहे.


एमआयडीसीचे उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख (9594612444) यांच्याकडे महामंडळाच्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक सेवाकरीता संबंधित असणाऱ्या उद्योगांना परवानग्या देणे.


क्षेत्र व्यवस्थापक जाधव (9850561338) यांच्याकडे जेजुरी, कुरकंभ, इंदापूर, भिगवण व पाटस


तसेच क्षेत्र व्यवस्थापक रासणे (8108908296) यांच्याकडे तळवडे, खराडी, हिंजवडी व खेड सेज या भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


जिल्हा उद्योग समितीचे व्यवस्थापक रेंधाळकर (9822285518), निरीक्षक उद्योग यशवंत गायकवाड (9404676667) आणि निरीक्षक उद्योग मनिषा गायकवाड (9923199633) यांच्याकडे वरील क्षेत्राव्यतिरिक्त इतर सर्व क्षेत्राकरीता सर्व अत्यावश्यक उद्योगांसाठी परवानगी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचेही श्री. राम यांनी आदेशात नमूद केले आहे.


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image