बारामती :- कोरोना प्रतिबंध करण्यासाठी बारामतीत संचारबंदी 100 टक्के यशस्वी व्हावी यासाठी प्रशासन सरकारच्या आदेशानुसार प्रयत्न करीत आहे.बारामती नगरपरिषद हद्दीत 44 प्रभागात 44 नगरसेवक,44 नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी , 44 पोलीस कर्मचारी,व प्रत्येक वार्डातील 10 स्वयंसेवकांमार्फत नागरिकाना घरपोच किरणा, भाजीपाला व औषधी पोहच करण्याची योजना आखण्यात आलेली आहे.
शेतकऱ्याचा शेती माल शेतात सडून खराब नये शेतकऱ्याचे कष्टाचे आर्थिक नुकसान होऊ नये व नागरिकांनाही तो वेळेत व ताजा आणि योग्य दरात मिळावा यासाठी बारामती नगरपरिषद हद्दीत ठरावकि भागासाठी ठराविक शेतकरी पुरवठादारांकडून भाजीपाला व फळे पुरवठा करण्यासाठी वेगळी यंत्रणाही तयार करुन त्यांच्यार्माफत भाजीपाला व फळे पुरविण्याचा उपक्रमही राबविला जात आहे.या उपक्रमासाठी शासकिय कर्मचारी समन्वयक म्हणून काम पहात आहेत.शेतकरी पुरवठा धारक कोणतेही दरपत्रक जाहीर न करता वांगी 1 किलो,कांदे 2 किलो,टोमॅटो 1 किलो,गवार अर्धा किलो,भेंडी अर्धा किलो,दोडका किंवा भोपळा अर्धा किलो,हिरवी मिर्ची पावशेर,कोथंबीर 2 पेंडया,मेथी 2 पेंडया,अशा पध्दतीने 300 ते 350 चे पॅकेज घरपोच जाहीर करीत आहेत.यामुळे नागरिकांना जो आवश्यक भाजीपाला घ्यावयाचा आहे त्याबाबत अडचण निर्माण होत असून भाजीपाला दरपत्रकाबाबत प्रशासनाचे कोणतेही निकष किंवा सुचना दिसून येत नाहीत.बारामतीतील प्रशासनाने संचारबंदी कडक अंमलबजावणी करीत असताना नागरिक सहकार्य करण्यास 100 टक्के तयार आहेत परंतू भाजीपाला पुरवठाधारकांकडून नागरिकांना ज्यादा दराने भाजीपाला पुरवठा केला जात नाही ना ? याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे . कोराना प्रतिबंधासाठी संचारबंदी कडक करीत असताना नागरिकांना भाजीपाला खरेदीत घरपोच च्या नावाखाली विनाकारण आर्थिक त्रास होणार नाही यासाठीही लक्ष देण्याची गरज आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मागील आठवडयातील दरपत्रक मागविले आहे त्यामधील फळभाज्या,पालेभाज्यांचे प्रतीनुसार किमान कमाल व सरासरी दर पत्रक सोबत जोडत आहे.शेतकरी ग्राहकांना भाजीपाला विक्री करताना लावलेले दर यामध्ये असणारी तफावत व भाजीपाला व फळभाज्यांचा दर्जा पाहिला तर ही एक प्रकारची लूटच दिसत आहे.तरी प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय घ्यावा व नागरिकांचे आर्थिक शोषण थांबवावे हि नम्र विनंती
बारामतीतील नागरिकांनीही कोरोनाला हरविण्यासाठी सरकारच्या सुचनेचे पालन करुन घरातच रहावे काटकसर करुन लॉकडाऊनचा काळ जाण्याची वाट पहावी ही विनंती.
संचारबंदीच्या काळात प्रशासनाने भाजीपाला दर नियंत्रित करावे