रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन

Controller of Rationing and Director of Civil Supplies


मुंबई, दि. 11 : कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती मिळविण्यासाठी 1800224950 किंवा 1967 या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.


लॉकडाऊन कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन बाबतीत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे.  रेशनिंग साठीच्या तक्रारीसाठी/रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करा किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवा, असे आवाहन जनतेस करण्यात आले आहे.


राज्यस्तरीय हेल्पलाईन ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार असून त्याचा हेल्पलाईन क्रमांक : 1800 22 4950/1967 (नि:शुल्क) आहे. अन्य हेल्पलाईन क्रमांक : 022- 23720582 / 23722970 / 23722483, ईमेल- helpline.mhpds@gov.in, ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी mahafood.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली याचा वापर करा. तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असून  हा कक्ष सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहील. त्याचा हेल्पलाईन क्रमांक- 022-22852814,ईमेल- dycor.ho.mum@gov.in असा आहे.


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image