बारामती :- राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना म्हणुन
जळोची उपबाजारातील फळे व भाजीपाला बाजार आवारात प्रवेश नियंत्रित करण्यात आले
आहेत. तरी शेतमाल उत्पादित करणा-या फळे व भाजीपाला विक्रीसाठी येणा-या शेतक-यांनी
कृषि अधिकारी यांचेकडुन पास/ परवाना घेवुन शेतमाल विक्रीस आणावा तसेच बारामती नगर
परिषद हद्दीत फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी नगर परिषदेकडुन माल विक्री करिता बसणेची
परवानगी असलेले पत्र / पास घेऊन यावे पत्र / पास असलेशिवाय कोणासही आवारात प्रवेश
दिला जाणार नाही. तसेच बारामती तालुक्यात गावोगावी विक्री करिता फळे, भाजापाला घेणा-
या विक्रेत्यांनी पंचायत समिती / ग्रामपंचायत यांचे परवानगी पत्र / पास घेवुन यावे त्यानंतर
आपणास प्रवेश दिला जाईल.
वरील सर्व बाजार घटकांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी सोशल
डिस्टन्सींग राखणेसाठी सहकार्य करावे असे बारामती तालुक्यातील सर्व नागरिकांना बारामती
तालुका प्रशासन व बाजार समिती बारामतीकडुन प्रसिद्धिपत्रकद्वारे विनम्र आवाहन करणेत येत आहे.