आपल्यातीलच गरजूंना आपल्यातीलच युवकांची मदत

बारामती कसबा येथील पंचशीलनगर मधील युवकांनी एकत्र येवून आपल्याच परिसरातील गरजूंना टाळेबंदीच्या काळात मदत करण्याचा विचार करून 230 कुटूंबाना प्रत्येकी  4 अंडी वाटप केली.1 महिना होऊन गेला टाळेबंदी असल्याने कष्टकरी जनतेसमोर रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.जीवनावश्यक वस्तू काटकसरीने वापरून कष्टकरी लोक दिवस घालवीत आहेत.अशा काळात आपल्याच परिसरातील युवक मदत करीत आहेत .हे सर्व युवक सामान्य कुटूंबातीलच आहेत परंतू आपणही आपल्या परिसरतील गरजूंना मदत केली पाहिजे ही भावना अतिशय महत्वाची आहे.मदत किती दिली हे महत्वाचे नसून गरजूंना मदत केली ही भावना आहे.हा उपक्रम राबवीण्यासाठी  अँड. सौरव कुंभार, विशाल सोनवणे,रणजीत आहिवळे,विकास आगवणे, स्वप्निल हरिहर यांचे योगदान कौतुकास्पद आहे