पुणे :- पुणे जिल्हयातील व पुणे विभागातील सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांना कळविण्यात येते की, काही ठिकाणी रुग्ण अथवा रुग्णांचे नातेवाईक फ्ल, कफ, सर्दी इ. वरील औषधांची विना प्रिस्क्रीप्शन खरेदी करण्यासाठी औषध दुकानात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर रुग्ण हे कोविड-१९ चे लागण किंवा कॅरीअर असु शकतात व त्यामुळे त्यांचा संसर्ग आपणास होण्याची व पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना प्रथम वैद्यकीय सल्ला व डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेवुन येण्यास सांगुन डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनवर अशा औषधांची विक्री करावी. अशा रुग्णांना डॉक्टरांचे तपासणी/सल्ल्याशिवाय औषधे दिल्याचे आढळल्यास संबधित अनुज्ञप्ती धारकावर सक्त कारवाई
करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आवाहन एस. बी. पाटील सह आयुक्त (औषधे)(पुणे विभाग)अन्न व औषध प्रशासन, म. रा, पुणे.यांनी केले आहे
सर्दी खोकल्याची औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशन शिवाय विकल्यास दुकानदारावर कारवाई