घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी घर भाडे न दिल्याने भाडेकरूंना निष्कासित करू नये – अपर मुख्य सचिव गृहनिर्माण

मुंबई दि 17 - देशात कोवीड १९ या साथीच्या रोगाच्या पार्श्वभुमीवर ३ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जारी राहणार आहे. या परिस्थितीत सर्व व्यापार,व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने रोजगारावर परिणाम झाला आहे. राज्यात भाड्याच्या घरात राहणा-या लोकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी अशा सुचना गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी सर्व घरमालकांना दिल्या आहेत.


लॉकडाऊन परिस्थितीमुळे सर्व बाजारपेठा, व्यवसायिक संस्था, कारखाने व एकूणच सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारवरही परिणाम झालेला असून, अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. यामुळे अनेकांना अत्यंत कठीण अशा आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात भाड्याच्या घरात राहणा-यांना नियमित भाडे भरणे शक्य होत नसून, भाडे थकत असल्याची वस्तुस्थिती आहे.


या परिस्थितीत घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या कालावधीत वेळेवर भाडे रकमांची अदायगी न झाल्याने किंवा भाडे थकल्याने कोणत्याही भाडेकरूंना भाड्याच्या घरांमधून निष्कासित करण्यात येऊ नये, अशा सुचना सर्व संबंधित घरमालकांना अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image